आमदार डावखरेंच्या हस्ते होणार १५३ गुणवंतांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२९-: भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यातील १५३ गुणवंतांचा होणार सत्कार सोहळा २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता स्वामिनी मंडपम येथे आयोजित केला आहे.


या सन्मान सोहळ्यात दहावी आणि बारावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातील सर्व प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी आणि ५ वी आणि ८वी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि १०० टक्के दहावी आणि बारावी निकाल देणा-या प्रशालेतील मुख्याध्यापक याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तरी या सन्मान सोहळ्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक तसेच शिक्षणप्रमी नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भापजा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page