१५ ऑगस्ट पर्यत त्या अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा आंदोलन…

भाजपा पदाधिकारी यांनी दिले देवगड तहसीलदार यांना अधिकाऱ्यांच्या तक्रारींचे निवेदन..

⚡देवगड ता.२९-: देवगड तहसीलदार कार्यालयातील नेहमी चर्चेत असलेला तक्रार खोर अधिकारी हे लोकांना समाधानकारक वागणूक देत नाहीत. वारंवार तक्रारी करून देखील पुन्हा त्याच खात्याची जबाबदारी प्रशासनामार्फत त्याच्याकडे का दिली जाते.याचा जाब विचारण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज देवगड तहसीलमध्ये धडक देत नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करत त्या अधिकारी यांच्या बाबत असलेल्या तक्रारीचा पाढाच वाचला. १५ ऑगस्ट पर्यंत त्या तक्रार खोर अधिकारी यांची अन्यत्र बदली न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष डॉ. अमोल तेली, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर, राजा भुजबळ, भाजपा गटनेते शरद ठुकरूल,गणपत गावकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर,व्ही. सी. खडपकर, बापू जुवाटकर,अनिल पुरळकर ,वैभव करंगुटकर,आजी माजी नगरसेवक नगरसेविका व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
देवगड तहसीलदार कार्यालयातील तो अधिकारी लोकांना समाधानकारक वागणूक देत नाही असा आमचा आरोप आहे.यापूर्वी त्यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या.समाजकार्यकर्त्यांनी आंदोलन उपोषण केली तरी महसूल विभाग त्या अधिकारी महाशयांना का पाठीशी घालत आहे त्याचे उत्तर आपण द्यावे अशी आक्रमक भूमिका घेतली. बदलीचे नाटक केले. त्यानंतर पुन्हा त्याला देवगडला आणून संजय गांधी विभागाचा पदभार दिला. हा पदभार पण नाटक होते. तो अधिकारी पुरवठा विभागाचे काम पाहत होता. एकीकडे संजय गांधी विभागात असल्याचे सांगून त्या महाशयाकडेच य पुन्हा त्याचं विभागाचे काम आपल्या कार्यालयाने दिले. यापासून ही व्यक्ती लोंकाची लूटमार करीत असल्याचा आरोप खडपे यांनी केला. तर वैभव करंगुटकर यांनी शेकडो तक्रारी आमच्याकडे आहेत. नाहक कागदपत्रांची मागणी करीत प्रकरणे कार्यालयात प्रलंबित आहेत त्याची चौकशी करावी. त्याची बदली झाली असताना पुन्हा देवगड मध्ये ही व्यक्ती बदलून आली कशी याची चौकशी झाली पाहिजे. खडपे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्या महसूल विभागाच्या त्या अधिकारी याचे बदल अनेक तक्रारी असताना आपण त्याच्याकडे पुरवठा विभागाचा पदभार दिलात हाच संशय वाटणारे आहे असे आमचे मत आहे. या अधिकाऱ्याला येत्या १५ ऑगस्ट पूर्वी देवगडमधून बदली केला नाहीत तर आम्ही तुमच्या कार्यालयात तीव्र आंदोलन छेडू. याला महसूल विभाग जबाबदार असेल असा इशारा दिला. गणपत गावकर यांनी चव्हाण याच्याबद्दल अनेक तक्रारी येतात तरी त्याला अभय कोणाचे मिळत आहे. यात सर्वसामान्य लोकांचे नुकसान होत आहे असे मत मांडले. माजी नगराध्यक्ष प्रियांका साळसकर यांनी अनेक लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत आपल्या विभागाला सांगूनही त्या आधी यांच्याकडेच पुरवठा विभागाचा पदभार का दिला गेला त्याची माहिती आपण द्यावी असे मत मांडले. कोणतेही शिष्टमंडळ येणार असे समजताच तो अधिकारी कार्यालयातून गायब कसा होतो. त्याला याची खबर नेमकी कोण देतो. आताही त्यांची कार्यालयात उपस्थिती नाही. नियमित ही व्यक्ती उशिरा येते अशी माहिती आमच्याकडे आहे असेही खडपे यांनी निदर्शनास आणून दिले. अनेक गावातील शिधापत्रिका प्रकरणे प्रलंबित ठेवली आहेत. अशा अनेक तक्रारीचे निवेदन भाजपा शिष्टमंडळाने नायब तहसीलदार यांना दिले आहे.

You cannot copy content of this page