⚡मालवण ता.२९-: क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने क्रीडा संकुल ओरोस याठिकाणी संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुले फ्री स्टाईल कुस्ती या क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी मिथिलेश रविंद्र खराडे याने ६१ किलो वजनी गटात प्रथम तर निशान नितीन शिरोडकर याने ७० किलो वजनी गटात प्रथम स्थान पटकावले. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या या दोघांचीही विभाग स्तरासाठी निवड झाली आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा.हसन खान यांचे मार्गदर्शन लाभले. या दोघांचेही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
