सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्न- सिंधू योजनेच्या माध्यमातून तब्बल 37 हजार लाभार्थ्यांना लाभ…

मंत्री दिपक केसरकर:तर महिलांना
उद्योग प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला..

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्न सिंधू योजनेच्या माध्यमातून तब्बल 37 हजार लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आला असून जवळपास आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी यामध्ये खर्च करण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

तर महिलांसाठी काथ्या उद्योग, शेळीगट वाटप, कुक्कुटपालन योजना तर मत्स्यविक्रेत्या महिलांना इ स्कूटर, काथ्या उद्योग प्रकल्पासाठीही भरिव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांनी महिन्याभराच्या आत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी असे आवाहनही श्री केसरकर यांनी केले.

मंत्री केसरकर यांनी आज रत्नसिंधू योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आज येथील नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात घेतली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या दरम्यान बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली. .

You cannot copy content of this page