सावंतवाडी-जिमखाना ते उभागुंडा स्टॉप येथील धोकादायक झाडे तोडा…

मंगेश तळवणेकर: सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी-जिमखाना ते उभागुंडा स्टॉप येथील घळणीवर अतिशय धोकादायक झाडे कोणत्याही क्षणी पडू शकतात. हल्लीच त्यातील दोन झाडे पडलेली आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने सदरची झाडे तोडून घ्यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.

दरम्यान हल्लीच शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी स्वत: खर्च करुन पोलीस बांधवांच्या घरावर व वसाहती मधील रस्त्यावरची झाडे तोडून घेतली आहेत. त्याबद्दल ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत.तरी कृपया स्थानिक आमदार मा.श्री.दीपकभाई केसरकर यांचेकडून त्वरीत निधी उपलब्ध करुन घेऊन संपूर्ण सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडे तोडून घेण्यासाठी भरीव आथिर्क तरतुद करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

You cannot copy content of this page