सुनील राऊळ: सर्वांना उपस्थित राहण्याचे केला आवाहन..
⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या सावंतवाडी या संस्थेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेचे कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक 28 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता कोलगाव मारुती मंदिर नजिक यांच्या सभागृहात आयोजित केले आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी आज येथे दिली.
दरम्यान पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या बेडसवणाऱ्या समस्या अडीअडचणी व त्यांच्या समोरील आव्हाने उपयोजना व कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी इन्शुरन्स गॅरंटी आणि कामगार कल्याण योजना संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही श्री राऊळ यांनी यावेळी सांगितले.
