निवडणूक तोंडावर आल्यने घोषणांचा पाऊस थांबवण्यासाठी योग्य मार्ग निवडा…

राजन तेली: कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा..

⚡सावंतवाडी ता.२५-: विधानसभा मतदारसंघांमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन अपेक्षित काम मला करायचे आहे, निवडणूक तोंडावर आल्यावर घोषणांचा पाऊस थांबवण्यासाठी योग्य मार्ग निवडा असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे केले. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कुटुंबीयांच्या सोबत श्री तेली यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.श्री तेली यांचा 63 वा वाढदिवस घरातील गवळी तिठा येथील विधानसभा कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.

श्री तेली पुढे म्हणाले मी केव्हाही माझा वाढदिवस साजरा करत नाही परंतु सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने मी यंदा माझा वाढदिवस केला असून आता आपली लढाई ही शेवटच्या टप्प्यात आहे, त्यामुळे सर्वांनी निश्चितच सहकार्य करावे., परंतु पार्टीने देखील याचा विचार करून आगामी विधानसभा निवडणूक या मतदार संघात भाजपच्या चिन्हावर लढवावी अशी मागणी श्री तेली यांनी यावेळी केली. दरम्यान गेल्या पंधरा वर्ष सावंतवाडी मतदारसंघ विकासापासून वंचित राहिल्या त्यामुळे आता लोकांना बदल हवाय त्यामुळे निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीकर परिवर्तन करतील असा विश्वासहीतील यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमासाठी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, प्रज्ञा ढवण, एकनाथ नाडकर्णी, रणजीत देसाई, मुलगा प्रथमेश सर्वेश आधी कुटुंबीय उपस्थितहोते.

You cannot copy content of this page