अर्चना घारे: मी माझं काम करत राहणार..
⚡सावंतवाडी ता.२३-: महाविकास आघाडीमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतचा निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ नेते सक्षम आहे, त्यामुळे मी माझं काम करत राहणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी आज येथे दिली.
दरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी काल सावंतवाडी मतदारसंघात शिवसेने ठाकरे गटाचे प्राबल्य असून आमचाच उमेदवार असेल अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याला उत्तर देताना आज अर्चना घारे परब यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
