बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य ह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत…

निखिल चिंदक:पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न..

⚡बांदा ता.१८-: समाजातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून समाजपयोगी काम करणाऱ्या बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत असून भविष्यात नवनवीन संकल्पना आत्मसात करून रोटरॅक्ट क्लबने समाजसेवेचा वारसा असाच निरंतर ठेवावा असे आवाहन रोटरॅक्ट क्लबचे सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना अधिकारी निखिल चिंदक यांनी येथे केले.

बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचा पदग्रहण सोहळा येथील आनंदी मंगल कार्यालयात संपन्न झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री चिंदक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागीय अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, बांदा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रमोद कामत, सचिव शिवानंद भिडे, बाबा काणेकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, रोटरॅक्टचे नूतन अध्यक्ष अवधूत चिंदरकर, सचिव मिताली सावंत, सहसचिव ईश्वरी कल्याणकर, माजी अध्यक्ष अक्षय मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रमोद कामत म्हणाले कि, रोटरी क्लबला बांद्यात काम करत असताना रोटरॅक्ट युथ क्लबने मोलाची साथ दिली. ‘यंग ब्रिगेड’ मध्ये काम करण्याची तळमळ ही कौतुकास्पद असून भविष्यात सातत्याने चांगले सामाजिक कार्य आपल्या हातून घडो.
शिवानंद भिडे म्हणाले कि, रोटरी व रोटरॅक्ट क्लबचे उद्दिष्ट हे केवळ सामाजिक असून दोन्ही क्लबच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी दोन्ही क्लब पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. माजी अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेत उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
यावेळी रोणापाल येथील दयासागर छत्रालयाला खुर्च्या, शैक्षणिक साहित्य तसेच बांदा केंद्र शाळेतील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी छात्रालयाचे व्यवस्थापक जिवबा वीर, केंद्रशाळेचे शिक्षक जे. डी. पाटील उपस्थित होते.
यावेळी नूतन कार्यकारिणी सदस्य विनिता कुबडे, रोहन कुबडे, संकेत वेंगुर्लेकर, अक्षय कोकाटे, शंकर कोकाटे, दत्तराज चिंदरकर, आयुष गवस तसेच सावंतवाडी क्लबची अध्यक्ष निकिता आराबेकर व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी कल्याणकर हिने केले. आभार मिताली सावंत हिने मानले.

You cannot copy content of this page