चेंदवण पुरग्रस्त भागाची आम. वैभव नाईक यांनी केली पाहणी..

⚡कुडाळ ता.११-: तालुक्यातील चेंदवण मळावाडी भागात कर्ली नदीच्या पाण्यामुळे मळावाडी भागातील घरांमध्ये पाणी पुसुन कुटुंबांचे नुकसान झाले आहे. यातील, काही कुटुंबे स्थलांतरित करुन चेंदवण प्राथमिक शाळेमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी चेंदवण भागातील स्थलांतरित कुटुंबांची आस्थेने चौकशी करुन धीर दिला. व वस्तु रुपात मदतही माजी सरपंच सौ उत्तरा धुरी यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, सरपंच वैभव चेंदवणकर नगरसेवक उदय मांजरेकर,माजी नगरसेवक सचिन काळप, शिवसेनेचे जेष्ठ बाळासाहेब धुरी, चेंदवण शिवसेना शाखाप्रमुख किरण कोचरेकर ,नेरुर जि प शिवसेना विभागप्रमुख शेखर गावडे, युवा सेनेचे अमित राणे,माजी शिवसेना नेरूर महीला उपविभागप्रमुख सौ प्रणाली प्रशांत तेंडूलकर युवा सेनेचे राजु गवंडे, कुडाळ शिवसेना उपशहरप्रमुख गुरु गडकर,व पोलीस पाटील उमेश शृंगारे, ग्रामसेवक निवतकर,व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page