Headlines

अनधिकृत मासेमारीवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु…

मच्छिमार व आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश:बाबी जोगी यांची माहिती..

⚡मालवण ता.११-: समुद्रात होणाऱ्या अनधिकृत मासेमारीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा उपयोगात आणण्यासाठी श्रमिक मच्छिमार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण दांडी किनारी ड्रोन प्रात्यक्षिक घेऊन त्याचे रेकॉर्ड आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून शासनाला सादर केले होते. याबाबत राज्यशासनाने सकारात्मक प्रतिसाद देताना सागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ड्रोन पाळत ठेवण्यासाठी ई निविदा प्रक्रिया प्रक्रिया सुरु केली आहे, मच्छिमारांच्या या प्रयत्नाला यश मिळाले आहे, अशी माहिती मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी दिली असून हे यश मच्छिमारांच्या एकजुटीचे हे फलित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

श्रमिक मच्छीमार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण दांडी किनारी ड्रोन प्रात्यक्षिक घेऊन ते कसे यशस्वी होते यांचे रेकॉर्ड शासनाला सादर केले. ह या ड्रोनचा वापर किनाऱ्यावर सुद्धा करता येणार असून ज्या नौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीच्या बोटीला बघून पळून जातात किंवा अधिकाऱ्यांनी इशारा करूनही थांबत नाहीत, अशा नौकांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने सागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात ड्रोन पाळत ठेवणे व देखरेख करणे यासाठी ई निविदा सूचना प्रसिद्ध करून निविदा मागविल्या आहेत. यामुळे मच्छिमारांच्या प्रयत्नांना व त्यासाठी आम. वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे, असे बाबी जोगी यांनी म्हटले आहे.

आपली रोजी रोटी वाचवण्यासाठी जे मच्छीमार किंवा संघटना संघर्ष करतात त्यांच्यासाठी हे यश म्हणजे थोडासा दिलासा आहे. या ड्रोन चा वापर चांगल्या प्रकारे केल्यास त्याद्वारे अनधिकृत मासेमारी बोटींना आळा बसू शकतो. सर्व अधिकाऱ्यांनी याचा उपयोग मच्छीमाऱ्यांच्या हितासाठी करावा ही अपेक्षा आहे. आमदार वैभव नाईक आणि ज्या ज्या आमदार तसेच मच्छीमार संघटना यांचे सहकार्य लाभले, त्यांचे आम्ही मच्छिमार आभारी आहोत, मच्छीमारांचा लढा पूर्ण यश मिळेपर्यंत चालू ठेवणार आहोत, असेही बाबी जोगी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page