कुडाळ : कुडाळेश्वरवाडीतील रहिवासी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातले एक नावाजलेले संगीततज्ज्ञ आणि ऑर्गन वादक सतीश शेजवलकर यांचे आज अल्पशा आजाराने कुडाळ येथे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. अनेक कीर्तने, संगीत नाटके, नामवंत गायकांच्या मैफिली यांना त्यांनी ऑर्गन आणि हार्मोनियमची साथ केली होती.
नादब्रह्म संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. त्या संस्थेमार्फत केलाय जाणाऱ्या सर्वच कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्याही ऑडिटर म्हणून काम केले होते. अनेक संगीत विषयक कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून सुद्धा त्यानी काम केले होते. संगीताचा जाणकार म्हणून त्यांना अनेक संगीत मैफिलीत बोलावले जायचे. नामवंत गायकांना त्यांनी संगीत साथ केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.
