संदीप गावडे:मंत्री रवींद्र चव्हाण खऱ्या अर्थाने ठरले पर्यायी महामार्गाचे शिल्पकार…
⚡सावंतवाडी ता.०९-: आंबोली घाटाला पर्याय केसरी फणसवडे नेनेवाडी ते आंबोली असा या मार्गाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्प मध्ये सत्तर कोटी रुपये ची तरतूद करण्यात आली असून निधीही मंजूर करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे खऱ्या अर्थाने या पर्यायी महामार्गाचे शिल्पकार आहेत त्यामुळे गेली 25 वर्ष हुन अधिक काळ प्रत्यक्षेत असलेला हा मार्ग आता होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिली
यावेळी त्यांच्यासोबत गेले सरपंच सागर ढोकरे, भास्कर गावडे आदी उपस्थित होते. श्री गावडे म्हणाले, गेले कित्येक वर्षापासून आंबोली या घाटमार्गाला पर्यायी मार्ग म्हणून पंचवडे नेनेवाडी चौकुळ व आंबोली मार्गाची मागणी होत होती परंतु यासाठी आवश्यक ती निधीची तरतूद नसल्याने हा पर्यायी मार्ग विकास पथावर आलेला नव्हता.
मात्र रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने कोकणाला पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम मंत्री लाभल्याने लोकांची असलेली मागणी आता पूर्णत्वास येणार आहे आज विधिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बजेटमध्ये मंत्री चव्हाण यांनी तब्बल सव्वा नऊ किलोमीटरच्या या मार्गाला मंजूर देताना तब्बल 60 कोटी रुपये तरतुद केले आहे. या मार्गामध्ये वनविभागाची येणारी खासगी जमीन लक्षात घेता त्याच्या भूसंपादनासाठी व इतर गोष्टीसाठी वेगळ्या दहा कोटीची तरतूदही पकडून एकूण 70 कोटीची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. लवकरच या प्रमुख जिल्हा मार्गाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते होणार असून आंबोली घाटातून जाताना ज्या प्रकारचे निसर्गसौंदर्य न्याहळता येते त्याच प्रकारचे निसर्ग पर्यटन नव्याने होणाऱ्या या पर्यायी मार्गातही पाहायला मिळणार आहे एकूणच जवळपास पाच ते सहा किलोमीटरचे अंतर यातून वाचणार आहे शिवाय वेळही वाचणार असून सक्षम आणि सुरक्षित असा हा मार्ग असणार आहे फणसवडे नेनेवाडी चौकूळ व आंबोली असा हा मार्ग जाणार आहे. एकूणच या मार्गाचे शिल्पकार हे रवींद्र चव्हाणच असून भविष्यातही जिल्ह्याला मोठा निधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
आंबोली घाट मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून गेले कित्येक वर्ष केसरी फणसवडे चौकुळ या मार्गाची मागणी केली जात होती अनेक लोकप्रतिनिधी राजकीय नेते यांनीही याबाबत आवाज उठवला होता आंबोली घाटमार्ग वाहतुकीच्या दृष्टीने दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याने या मार्गाची मागणी जोर धरत होती परंतु अपेक्षित असे काही चित्र नसताना विधिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे बजेट मांडताना मंत्री श्री चव्हाण यांनी या मार्गाला मंजुरी दिल्याने एक प्रकारे आंबोली घाटमार्गाला सक्षम असा पर्याय निर्माण होणार आहे एकूणच या निर्णयाचे जनतेतून तू होत आहे असेही श्री गावडे म्हणाले.
