उद्या शुभारंभ:ज्युससह ५० विविध प्रकारचे डोसे आणि बर्गर सारखे अनेक खाद्य प्रकार मिळणार एकाच दालनात
*💫सावंतवाडी दि.०२-:* मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात मिळणारी स्मुदी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहरात मिळणार आहे. ५० शेट्स ( द – अनलिमिटेड फ्लेवर) च्या माध्यमातून सावंतवाडीतील खाद्य प्रेमींना स्मुदी ज्युससह ५० विविध प्रकारचे डोसे आणि बर्गर या सारखे अनेक खाद्य प्रकार एकाच दालनामध्ये मिळणार आहेत. यासाठी नवोदित उद्योजक श्री. कुणाल चोडणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडीत एक आगळा वेगळा कॅफे सुरू केला आहे. या कॅफेचे उद्घाटन उद्या सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर आणि स्क्रीन प्रोड्युसर महेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच खाद्य प्रेमींसाठी हा अनोखा असा उपक्रम राबवत असल्याचा दावा श्री.कुणाल चोडणकर यांनी केला आहे. सावंतवाडी शहरातील रामेश्वर प्लाझा मध्ये उद्यापासून हा कॅफे खाद्य प्रेमींच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहकाच्या खिशाला परवडेल अशा किंमती मध्येच येथे सर्व खाद्य पदार्थ खाद्य प्रेमींना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री.कुणाल चोडणकर यांनी केले आहे.
