तिलारी घाटात भूस्खलन…

रस्त्याचा काही भाग गेला वाहून..

⚡दोडामार्ग ता.०७-: तिलारी घाटात मुसळधार पावसामुळे भू स्खलन होऊन डांबरी रस्त्याच्या काही भागासह डोंगराचा भागही दरीत कोसळला.सुदैवाने त्यावेळी त्या मार्गावर वाहने नसल्याने अनर्थ टळला.काही वर्षांपूर्वी असाच मुसळधार पाऊस कोसळत होता तेव्हा तिलारी घाटातील काही ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ता बंद झाला होता.यावेळीही गेले चार पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.अनेक ठिकाणी भूस्खलन,झाडांची,घरांची पडझड झाली आहे. तिलारी घाटातही आज (ता.७) भूस्खलन झाले आणि रस्ता वाहून गेला.

You cannot copy content of this page