संजयच्या काव्य लिखाणाने मी भारावून गेलो…

संग्राम पाटील:देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी च्या वतीने स्वर्गीय संजय धुरी यांच्या कथा काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन…

⚡देवगड ता.०६-: एखाद्या बसल्या ठिकाणी काव्य करण्याची स्व.संजय चे अंगी असलेल्या काव्य लेखनाच्या कलेने भारावून गेलो व त्याने केलेल्या कथा, काव्य लेखनाचे प्रकाशन करण्याचे दिलेले वचन , दिलेला शब्द पूर्ण करू शकलो .यासारखा दुसरा कोणताही आनंद नसून या कथा काव्य संग्रहाचे प्रकाशन होत आहे.हीच त्यांना खरी ठरली आहे. उद्योगपती रोटे.संग्राम पाटील यांनी जामसंडे येथे स्व.संजय काव्य कथा या पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी बोलताना केले.


रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी आयोजित स्व.संजय धुरी यांचे काव्य व कथा संग्रहाचे प्रकाशन सोहळ्याचे उदघाटन स्व.संजय धुरी यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या वेळी. प्रमुख पाहुणे – PDG श्री. संग्राम पाटील, कोल्हापूर District- 3170
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद वसंत जोशी, वाडा, देवगड ( लेखक आणि शीघ्रकवीदेवगड) रोटे.सौ., उत्कर्षा पाटील रोटे.डॉ विद्याधर तायशेटे,रोटे.प्रेसिडेंट रोटे.प्रवीण पोकळे,रोटे.हनीफ मेमन,सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर,आयुष धुरी,अनुप धुरी,उपस्थित होते.सोहळ्याचे अध्यक्ष कवी प्रमोद जोशी यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत “संजय
कथा ,काव्य ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी मान्यवरांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी चे वतीने करण्यात आले.रोटे.प्रेसिडेंट प्रवीण पोकळे यांनी प्रास्तविक करून संजयच्या स्मृतींना उजाळा दिला. मित्र राजू पाटील जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर रोटे.दादा
कुडतडकर यांनीही आपले अनुभव कथन केले. रोटे.डॉ विद्याधर तायशेटे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्व.संजय धुरी यांचे स्मरणार्थ रोटरी चे माध्यमातून ब्लड स्टरेज युनिट,वॉटर एटीएम,रोटरी महोत्सव या सारखे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणात कवी प्रमोद जोशी यांनी पुस्तक प्रकाशन सोहळा हा शा उत्सव ,शब्द ब्रम्हाचा सोहळा आहे.असे सांगून संजय आणि आठवण, सहाण चंदन हे स्व.संजय धुरी यांचेवरील काव्य सादर केले.सोहळ्याचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी उपस्थितांचे आभार रोटे.मनीषा डामरी यांनी मानले.
देवगड मधील हरहुन्नरी व्यक्तिमत्व कवी लेखक स्व .संजय भालचंद्र धुरी आपल्यातून निघून गेले. देवगड चा भारदस्त आवाज अशी त्यांची सर्वत्र ख्याती होती. त्याचप्रमाणे
त्यांना उपजत असलेली लेखनाची आवड वाचकांवर छाप पाडत होती. त्यांनी लिहिलेल्या काव्य तसेच
कथा संग्रहाचे प्रकाशन व्हावे असे त्यांचे स्वप्न होते.

You cannot copy content of this page