नाडण कानडेवाडी येथील ३५ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या…

⚡देवगड ता.०५-: नाडण कानडेवाडी येथील ३५ वर्षीय विनायक मधुकर कानडे यांचा मृतदेह नाडण माडाची घोवी येथील आंबा आंबा कलम झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत गुरुवारी ४ जुलै रोजी रात्री ७ वाजता दिसून आला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाडण कानडेवाडी येथे विनायक मधुकर कानडे (३५) राहणार नाडण कानडेवाडी हे नाडण माडाची घोवी येथील स्वतःच्या मालकीच्या कलम बागेत गळफास लावलेल्या स्थितीत गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दिसून आले. त्यांना तेथून खाली उतरून देवगड ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले .मात्र देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून ते मयत झाल्याचे घोषित केले. याबाबतची फिर्याद प्रकाश हरी कानडे वय ६५ राहणार नाडन कानडेवाडी यांनी देवगड पोलिसात दिली असून देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतच्या अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करत आहेत. मयत विनायक यांच्या पश्चात आई ,पत्नी, मुलगा, असा परिवार आहे.

You cannot copy content of this page