⚡मालवण ता.०५-: समाज कार्याचा वसा घेतलेल्या मालवण मधील धक्का मित्रमंडळाने आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले असून मालवण देऊळवाडा येथील जि. प. प्राथमिक शाळा देऊळवाडा या प्रशालेतील गरजू ३५ मुलांना धक्का मित्रमंडळातर्फे वह्या वाटप करण्यात आले.
मुलांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने धक्का मित्रमंडळाने केलेल्या मदतीबद्दल प्रशालेतर्फे मंडळाच्या सदस्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी धक्का मित्रमंडळाचे सदस्य देवदत्त तोडणकर, हेमंत शिरगांवकर, नितेश जाधव, भुषण पिसे, रोहित चव्हाण, शंकर पाटकर, नितिन कोटीयान, विशाल वाळके तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता यादव, शिक्षिका अदिती ठाकूर आदी उपस्थित होते.
