भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली : वाझेचे पैसे झिरपत झिरपत आले जिल्ह्यात
*💫कणकवली दि.०२-:* जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती निवडीत फसवे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. वाझेचे पैसे झिरपत झिरपत जिल्ह्यात आले. जि प सदस्य फोडण्यासाठी सेनेने दाखवलेली लाखोंची आमिषे दाखवण्यात आली. फोडाफोडीसाठी आलेल्या पैशांच्या हिशोबातून आता शिवसेना पदाधिकाऱ्यांत वाद सुरू झाले आहेत. सेना पदाधिकारी एकमेकांकडे संशयाने पाहत असल्याचा दावाही भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. आलेले मात्र खासदार नारायण राणे, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपा एकसंध आहे. पुढील निवडणुकीची तयारी आमची असून आगामी जिल्हा बँक, जि.प.पं. स. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपा शतप्रतिशत जिंकणार.
