शिक्षण मंत्र्यांच शिक्षण झालेल्याच शाळेला कुलूप…

विनायक राऊत: राजन तेलींची मागणी योग्यच; केसरकारांनी शिक्षणाचे वाजवले तीन तेरा..

⚡सावंतवाडी ता.०५-: शिक्षणमंत्र्यांचे ज्या शाळेमध्ये शिक्षण झालं त्याच शाळेला आज कुलूप लावून या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचे काम या शिक्षण खात्याने केल आहे. शिक्षण मंत्र्यांच्या घराच्या बाजूलाच असलेली जिल्हा परिषदेची शाळा कोसळते आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागते ही गोष्ट खरोखर दुर्देवी आहे असा आरोप माजी खासदार विनायक राऊत त्यांनी आज इथं केला.

दरम्यान, राजन तेलींनी केलेली मागणी ही योग्यच असून त्यामध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे योग्यच आहेत. केवळ आणि केवळ सिंधुदुर्ग-रत्नागिरी सारख्या डोंगरी भागांना ज्या काही सवलती मिळाल्या होत्या त्या पूर्णपणे काढून टाकायच काम या शिक्षणमंत्र्यांनी केल असून एक प्रकारे शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायच काम शिक्षणमंत्री दिपक केसरकर करत असल्याचा आरोप ही श्री राऊत यांनी यावेळी केला‌ श्री. राऊत आज सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडी शहरातील शाळा नंबर एकची कोसळलेल्या भागाची पाहाणी केली यावी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.

ते पुढे म्हणाले की सिंधुदुर्गातील किमान २२ शाळा हे जीर्ण अवस्थेत आहेत. त्या कधीही कोसळु शकतात तरी देखील त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसवलं जातंय त्यामुळे शिक्षण खात्याची लापरवाही महाराष्ट्राला शोभ देणारी नसून किंबहुना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम शालेय शिक्षण मंत्री करतायत असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी आज केला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शैलेश गावंढळकर बाबुराव धुरी, बाळा गावडे, मायकल डिसोजा शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार अजित सांगेलकर, कौस्तुभ गावडे जानवी सावंत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page