⚡बांदा ता.०५-: रोणापाल गावचे ज्येष्ठ नागरिक दशरथ न्हानू गावडे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त गावातील दयासागर छात्रालयाला महिनाभर पुरेल एवढा धान्यसाठा व गॅस शेगडी देण्यात आली. गोरगरीब मुलांसोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी सुदिन गावडे, सोनाली गावडे, माजी सरपंच प्रकाश गावडे, शिवसेना(ठाकरे) शाखा प्रमुख मंगेश गावडे, तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष बाबल तुयेकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, सामाजिक कार्यकर्ते सचिन कुबल, उमेश तुयेकर आदी उपस्थित होते.
छात्रालयाच्या वतीने व्यवस्थापक जीवबा वीर यांनी दशरथ गावडे व कुटुंबीय, मित्रपरिवार यांचे आभार मानले.
रोणापाल छात्रालयाला साहित्य वाटप…
