‘डेरवण युथ गेम्स २०२१’ मध्ये सिंधुदुर्गला तीन सुवर्ण तर एक कांस्य पदक…

बांद्यातील वैष्णवी भांगले हिने पटकावले कांस्य पदक

*💫बांदा दि.०२-:* २४ ते ३१ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘डेरवण युथ गेम्स २०२१’ मध्ये सिंधुदुर्गच्या नेमबाजांनी चमकदार कामगिरी करत ३ सुवर्ण व १ कांस्य पदक पटकविले. ही स्पर्धा १० मीटर ओपन साईट, १० मीटर पीप साईट व १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात घेण्यात आली .१७ वर्ष वयोगटात साईश दिगंबर तलनकर, सावंतवाडी याने एअर पिस्तूल प्रकारात ४०० पैकी ३६२ गुण मिळवित सुवर्ण पदक पटकविले तसेच १४ वर्ष वयोगटात आयुष दत्तप्रसाद पाटणकर, सावंतवाडी याने ४०० पैकी ३४२ गुणांची नोंद करत सुवर्ण पदक मिळविले. सानिया सुदेश आंगचेकर, वेंगुर्ला हिने १७ वर्ष वयोगटात ओपन साईट क्रीडा प्रकारात ४०० पैकी ३१५ गुण मिळवत सुवर्ण पदक मिळविले. याच वयोगटात पीप साईट प्रकारात वैष्णवी गोविंद भांगले, बांदा हिने ४०० पैकी ३७७ गुणांची नोंद करत कांस्य पदक पटकाविले. हे सर्व खेळाडू सावंतवाडी, वेंगुर्ला व बांदा येथील उपरकर शूटिंग अकादमी येथे सराव करत असून त्यांना प्रशीक्षक कांचन वसंत उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या खेळाडूंचे सिधुदुर्ग जिल्हा शूटिंग अससोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले.

You cannot copy content of this page