तालुका स्कूल प्रशालेचा उपक्रम..
वैभववाडी प्रतिनिधी
शेतीचे प्रमाण कमी होत असून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर शेतीविषयक आवड आणि कृषी ज्ञान मिळणे गरजेचे आहे. यानुसार बुधवारी दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन घेतले भात लावणीचा अनुभव शेतकरी जगला तर माणूस जगणार ही भावना आधुनिक जगात विद्यार्थ्यांचे मनात रुजवने गरजेचे असून कृषीज्ञान वाढले तर भविष्यात देशाचा कृषी उचंक वाढेल आणि मोठे शेतकरी निर्माण होतील.
आज तालुका स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दत्तात्रय माईणकर यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शेतीचे ज्ञान घेऊन भात लावणी केली यावेळी मुख्याध्यापिका दर्शना सावंत उपशिक्षक दिनकर केळकर मनीषा साठे व लांडगे मॅडम आधी विद्यार्थी उपस्थित होते.
