धरण प्रकल्प तलावाच्या पाण्यात सोडलेला पंप अज्ञाताने चोरला…

कळसुली येथील घटना: पोलिसांकडून तपास सुरू..

⚡कणकवली ता.०३-: नजीकच्या कळसुली गावातील काजू बागेत पाणी घेण्यासाठी तेथील देणदोनवाडी धरण प्रकल्प तलावाच्या पाण्यात सोडलेला पंप अज्ञाताने पाईप कापून चोरून नेला. याप्रकरणी काजू बागेचे मॅनेजर किरण सुधाकर सावंत (रा. नरडवे, सध्या रा. कलमठ बिडयेवाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १७ जून सांयकाळी ७ वा. ते १८ जून सकाळी ८ वा. च्या मुदतीत घडला. हनुमंत नागेश सावंत यांनी आपल्या काजू बागेत पाणी देण्यासाठी तेथील तलावाच्या पाण्यात दीड एच.पी. चा पाण्याचा पंप सोडला होता. १८ जून रोजी सकाळी ८ वा. च्या सुमारास काजू बागेचे मॅनेजर किरण सावंत हे बागेत पाणी घालण्यासाठी आले असता त्यांना तलावातील पाण्यात सोडलेल्या पंपाच्या पाईप अज्ञाताने कोणत्यातरी साहित्याच्या सहाय्याने पाईप कापून चोरून नेला. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र शेगडे करत आहेत.

You cannot copy content of this page