नवीन इमारतीचं काम सुरू असल्याने आमचा व्यवसाय होत नाही…

भाजी विक्रेत्यांनी संजू परबांनकडे केली स्थलांतराची मागणी: तर मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढू ;संजू परब..

⚡सावंतवाडी ता.०३-: संत गाडगेबाबा मंडईचे नवीन इमारतीचं काम सुरू असल्याने गवत मार्केटमधील आमचा व्यवसाय होत नाही. त्यामळे आम्हाला इतर ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी गवत मार्केट मधील भाजी विक्रेत्यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे केली.

दरम्यान या संदर्भात आपण मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन श्री परब यांनी यावेळी उपस्थितांना दिले.यावेळी अजय गोंदावळे, सचिन साटेकर, आदी व्यापारी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page