अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद:श्वानपथक को ठसेतज्ञ घटनास्थळी दाखल..
⚡देवगड ता.०३-: पडेल कॅन्टीन येथील तीन दुकाने फोडून सुमारे ८८०० रुपये रक्कम चोरून नेली आहे. बुधवारी सकाळी चोरी झाल्याचे दुकान मालकाचे निदर्शनास आले.शेजारील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित चोरटा कैद झाला आहे. मात्र त्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला आहे व डोक्यावर टोपी आहे. संशयिताचा वावर सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये दिसत आहे .मोबाईल टॉर्च वापर करून कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला असे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसे तज्ञ दाखल झाले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पडेल कॅन्टींग येथे चोरट्याने मंगळवारी रात्री तीन दुकाने फोडली. यामध्ये जगदीश सखाराम येंडे यांच्या मालकीचे आशीर्वाद बंगल स्टोअर हे बांगड्याचे दुकान या दुकानाचे शटरचे कुलूप फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून ५००० रुपये चोरले. जगदीश येंडे यांच्या बांगड्याच्या दुकानांमध्ये त्यांचे वडील सखाराम येंडे व त्यांच्या समवेत अंजली भाटले, सानिका मुळम व तन्वी माशये हे तीन कामगार कायम असत. नेहमी सकाळी ७:३० वाजता दुकान उघडून ते रात्री ९ वाजता दुकान बंद करीत. मंगळवारी रात्री ९ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. बुधवारी सकाळी ६ वा. सुमारास जगदीश येंडे यांना पडेल कॅन्टींग येथील त्यांच्या सहकारी व्यवसायिकांचा तुमच्या दुकानाचे अर्धे शटर उघडलेले आहे. असा फोनवरून कळविल्यानंतर येंडे हे तात्काळ सकाळी दुकानाकडे आले यावेळी त्यांना दुकानाचे कुलूप फोडलेले दिसले दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या दुकानाच्या आतील काचेच्या पार्टिशनची उजव्या बाजूची काच फोडलेली होती. व बाजूला लोखंडी शीग ठेवलेली होती. तसेच ड्रॉवरमध्ये ठेवलेले पाच हजार रुपये चोरून नेले होते. तसेच पडेल कँटीन येथील विशाल पांगेरकर यांच्या सलगर चहा या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून १४०० रुपये तर स्वप्निल कोकरे यांच्या स्वप्नील बेकरीचे कुलूप तोडून २४०० रुपये चोरून नेले. याबाबतची तक्रार तिन्ही दुकान मालकांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकांत दिली. बुधवारी सकाळी सहा वाजता हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला त्यानंतर त्यानी विजयदुर्ग पोलीस स्थानकात कळविले. घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, दशरथ चव्हाण, पोलीस हवालदार प्रशांत जाधव, यांनी पडेल कॅन्टीन येथे घटनास्थळी येऊन पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर शॉन पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले
