आरे हायस्कूलचे शिक्षक सागर फाळके राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित…

⚡देवगड ता.०३-: देवगड तालुक्यातील श्री आरेश्वर हायस्कूल आरे या प्रशालेचे गणित विषयाचे शिक्षक सागर एकनाथ फाळके यांना नुकताच यांना नुकत्याच अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर तर्फे राज्यस्तरीय लोकराज्य राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2024 ने कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले.
तालुक्यातील आरे गावचे सुपुत्र सद्या आरेश्वर हायस्कूल आरे या प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले गणित विषयाचे शिक्षक सागर एकनाथ फाळके यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार २०२४ हा देऊन त्यांना कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले. आरे हायस्कूल या प्रशालेच्या आलेख उंचावत ठेवण्यासाठी फाळकेसर यांच नेहमीच योगदान आहे . त्यांना त्यांच्या योगदानाच्या बद्दल हा पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच आरे
गावच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page