जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे स्थलांतरित करावे…

राजन तेली: राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे विविध समस्यांबाबत वेधले लक्ष..

⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यासाठी कोणतीही वैद्यकीय सोय नाय, त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील रुग्णांना गोवा राज्यातील रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे जिल्हा रुग्णालय हे सावंतवाडी येथे अधिकारी व कर्मचारी वर्गासह लवकरात लवकर स्थलांतरित करावे अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी आज राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग जनतेने केलेल्या मागणीप्रमाणे आपण यावर योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदन द्वारे केली आहे श्री तेली यांनी आज मुंबईत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेत जिल्ह्यातील आरोग्य समस्यांबाबत लक्ष वेधले.

You cannot copy content of this page