शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ मध्ये शिरगांव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

⚡देवगड ता.०३-: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिरगांव हायस्कूलच्या ७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

यामध्ये इयत्ता पाचवी मधील कुमारी स्वरा यीगेश पाकले हीचा जिल्हा सर्वसाधारण यादीत ८ वा क्रमांक ,कु अंश सखाराम तेली याचा जिल्हा सर्वसाधारण यादीत १३ वा क्रमांक,तर
इयत्ता ८ वी मधील कु. अथर्व बापू खरात याचा जिल्हा सर्वसाधारण यादीत १६ वा क्रमांक , कुमार कुणाल महेश चौकेकर याचा जिल्हा सर्वसाधारण यादीत ३१ क्रमांक , कुमार कार्तिक महेश चौकेकर याचा जिल्हा सर्वसाधारण यादीत ५९ क्रमांक, कु सृष्टी सखाराम तेली हिने तालुका यादीत प्रथम क्रमांक तर कु.मनस्वी सचिन मेस्त्री हिने तालुका यादीत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.इयत्ता ५ वी मध्ये २ विद्यार्थी व इयत्ता ८ वी मध्ये ५ विद्यार्थी असे एकूण ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्याना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे मुख्याध्यापक व संस्था पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page