सावंतवाडी मतदार संघावर आमचाच आग्रह असेल…

रुपेश राऊळ:पण महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचा आम्ही प्रचार करू…

⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आमचा आग्रह असेल उबाठा शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ यावा. तशी अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे करू, अशी प्रतिक्रिया तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी
पत्रकारांनी केलेल्या प्रश्नाला दिले आहे.

दरम्यान दहा वर्ष शिवसेनेचा आमदार इथे आहे. त्याआधीही होता, राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचा आमदार अधिक काळ आहे‌‌. महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचा आम्ही प्रचार करू. मात्र, आम्हाला प्राधान्य द्यावं यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे आमची प्रमुख मागणी राहिलं असं मत त्यांनी व्यक्त केल.

यावेळी उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page