निरंजन डावखरेंबाबत ती गोष्ट खरी; पण आम्ही ती चूक सुधारू…

विशाल परब: फटाक्यांची आतिषबाजी करत विजयउत्सव केला साजरा..

सावंतवाडी ता.०३–: आ निरंजन डावखरेंबाबत पदवीधर मतदारांना भेटत नसल्याने काहीशी नाराजी होती, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना ती गोष्ट सांगितली असून ती बाब येणाऱ्या काळात आम्ही सुधारून जे प्रलंबित प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आम्ही निश्चितच सर्व भारतीय जनता पार्टी म्हणून प्रयत्न करू, असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान निरंजन डावखरे यांचा एकतर्फी विजय झाल्याबद्दल आज भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आपल्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत व मिठाई भरवून विजय उत्सव साजरा केला.

ते म्हणाले पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्या ताकदीच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन काम केल्याने श्री डावखरे यांचा विजय एकतर्फे होऊ शकला. त्यामुळे मी प्रथम सर्व कार्यकर्त्यांचे देखील मनापासून आभार मानतो असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान लोकसभा पाठोपाठ पदवीधर निवडणुकीत देखील भाजपने कोकणात बाजी मारली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुका देखील आम्हीच जिंकू असा विश्वासही परब यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page