पक्षाला योग्य वाटल्यास पक्ष विधानसभेसाठी माझा विचार करेल…

विशाल परब : तर राजन तेली हे महान नेते तर संजू परब हे माझे मोठे भाऊ..

⚡सावंतवाडी ता.०३-: मी सर्वसामान्यांसाठी काम करणारा व्यक्ती आहे. 2009 पासून मी सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे पक्षाला जर विधानसभेसाठी मी योग्य उमेदवार आहे अस वाटल तर पक्ष निर्णय घेईल, कोण बाहेरचा व कोण स्थानिक दुय्यम आहे, मी एक भारताचा नागरिक आहे, शिवाय सावंतवाडी मतदारसंघ हा पूर्वी माणगाव खोऱ्यालाच जोडला होता त्यामुळे मी कोणाच्या टीकेला उत्तर देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे मांडली.

दरम्यान राजन तेली जे काय आपली भूमिका मांडतायत त्यावर मी बोलणं योग्य नाही ते एक महान नेते आहेत तर संजू परब जरी माझ्यावर बाहेरचा म्हणून बोलत असले तरी ते माझे मोठे भाऊ आहेत त्यामुळे मी त्या दोघांवर बोलणं योग्य वाटत नाही असेही श्री परब यावेळी बोलताना म्हणाले. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक उमाकांत वारंग माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर, दिलीप भालेकर केतन आडगावकर प्रसन्न गंगावणे अमित परब आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page