सावंतवाडी येथील घटना:बेकरीचे नुकसान:मालकाने केले न प च्या बंबाला पाचारण
*💫सावंतवाडी दि.०२-:* रामेश्वर प्लाझा जवळ असणाऱ्या गौरव जाधव यांच्या मालकीच्या जस्ट बेक बेकरीला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. आग लागल्याचे समजताच प्रसंगावधान ठेवत मालक गौरव जाधव आणि आनंद गावकर यांनी तातडीने पालिकेचा बंब पाचारण केले. बंब वेळीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही आहे.
