राजन तेली: माझा आणि केसरकर यांचे मनोमिलन झालं तर मतदारसंघाचे मोठे नुकसान होणार..
⚡सावंतवाडी ता.०२-: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर काय चर्चा झाली ही जर मी उघड केली तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उघडे पडतील. असे भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
श्री तेली म्हणाले श्री केसरकर सांगत आहेत श्री बावनकुळे यांच्यासमोर चर्चा झाली मग ती चर्चा मी उघड केली तर ते उघडे पडतील. मी इच्छुक आहे की नाही हा प्रश्न नाही मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा भाजपला मिळावा अशी आमची मागणी आहे माझे आणि केसरकर यांचे मनोमिलन कधीही होऊ शकत नाही आणि जर का मी मनोमिलन केले तर या मतदारसंघाचे मोठे नुकसान होईल असेही ते म्हणाले
