वाहतूक पोलिसांनी वसूल केला १७ हजार ८०० रुपयांचा दंड
*💫सावंतवाडी दि.०१-:* वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या तीन दिवसात सावंतवाडी शहरात एकूण ६२ वाहनांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली असून, या कारवाईत एकूण १७,८०० एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
या कारवाईत विना लायसन गाडी चालवणारे युवक, धूम स्टाईल बाईक चालवणारे युवक, तसेच इन्शुरन्स संपलेल्या गाड्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यावेळी वाहतूक पोलीस प्रवीण सापळे, सुनील नाईक, सखाराम भोई, आदींनी कारवाईत सहभाग घेतला होता.
