केसरी येथील पाईप लाईन गुरांना पाणी देण्यासाठी फोडली…

नगराध्यक्ष संजू परब यानी व्यक्त केला संशय;अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करणार

सावंतवाडी-: शहरात केसरी येथून पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली असल्याने गेले दोन दिवस शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न भेडसावत आहे. ही पाईप लाईन दुरुस्ती काम सुरू असताना ही पाईप लाईन अज्ञात व्यक्तींनी फोडली असल्याची त्यानी नगराध्यक्षांना सांगितले आहे. यावेळी ही पाईप लाईन अज्ञात व्यक्तींनी गुरांना पाणी देण्यासाठी फोडण्यात आली असल्याचा संशय नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला आहे. या अज्ञात व्यक्ती विरोधात उद्या नगराध्यक्ष संजू परब पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page