एकाची मालमत्ता केली सील; काहिंना काढल्या जप्तीच्या नोटीसा
मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेच्या कर विभागाने धडक कारवाई करीत थकित मालमत्त कर न भरणाऱ्या शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाची मालमत्ता सील केली आहे. तसेच थकित पाणीपट्टी असलेल्या शहरातील पाच नळ कनेक्शन बंद केली आहे. नगरपालिकेकडून मालमत्ता कराची वसुली सुरू असून जप्तीच्या नोटिसा काढण्यात आल्या. तरी अद्यापर्यंत ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराची रक्कम भरलेली नाही. त्यांच्या मालमत्तेवर जप्तीच्या कारवाईची मोहिम बुधवारपासून मालवण नगरपरिषदेच्या कर विभागाने हाती घेतली आहे. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या सुचनेनुसार पथकप्रमुख करनिरीक्षक गितांजली नाईक, विजय रावले, बस्त्याव फर्नांडीस, बाळकृष्ण जाधव सहभागी झाले होते.
