भात शेती बरोबर कडधान्याचे नुकसान;खारे पाणी शेतीत घुसल्याने झाला दुष्परिणाम
मालवण दि प्रतिनिधी गेले चार दिवस कालावल खाडीला आलेल्या उधानाचा फटका चिंदर, लब्देवाडी, साठमवाडी, पालकरवाडी, त्रिंबक, बांदिवडे, गावडेवाडी या भागांना बसल्याने या भागात होणाऱ्या भात शेती बरोबरच चवळी, कुळीद, मूग ही कडधान्ये तसेच भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे खाडीच्या उधाणाचे खारे पाणी खाडी किनाऱ्यावरील भागात घुसल्याने सुमारे ७०० एकरचे क्षेत्र नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान दोन वर्षापूर्वी या खाडी किनारी मंजूर झालेला खारभूमी विभागाच्या बंधाऱ्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने त्याचा फटकाही ग्रामस्थांना बसला आहे. जर वेळेत बंधारा पूर्ण झाला असता तर उधाणाचे पाणी शेत जमिनीत घुसले नसते. ठेकेदाराने दाखविलेल्या निष्काळजीपणा मुळे याचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया समीर लब्दे यांनी व्यक्त केली आहे मालवण तालुक्यातील कालावल खाडीकिनाऱ्यावरील चिंदर, लब्देवाडी, साठमवाडी, पालकरवाडी, त्रिंबक, बांदिवडे, गावडेवाडी या भागांना खाडीच्या उधानाचा फटका बसला आहे या बाबत चिंदर सरपंच उपसरपंच कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली आहे. चिंदर लब्देवाडी साटम वाडी भागात खाडी किनारी परीसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेती बरोबरच चवळी,कुळीद मुग आदी कडधान्यांची लागवड केली जाते. पौर्णिमेनंतर सोमवारपासून सलग चार दिवस आलेल्या उधाणाचा फटका या भागाला बसला आहे.या भागातील ३५ते४०शेतकरयांच्या शेतात उधाणाचे खारे पाणी घुसल्याने सुमारे ७००एकर क्षेत्र खारपड होण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागातील भातशेती बरोबरच कडधान्य शेतीची खारया पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.चवळीची रोपे पिवळी पडून मरू लागली आहेत. या बाबत चिंदर सरपंच राजश्री कोदे,उप सरपंच दिपक सुर्वे, कृषी सहाय्यक सुनिल कदम, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या वेळी त्यांच्या समवेत शेतकरी प्रविण लब्दे, ग्रामपंचायत कर्मचारी रणजित दत्तदास आदी उपस्थित होते *ठेकेदाराने बंधाऱ्याचे काम अर्धवट ठेवल्याने उधाणाचा फटका* –समिर लब्दे चिंदर लब्देवाडी येथील शेतकरी व माजी ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे यांनी या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात उधाणाचे पाणी घुसण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे सांगून या भागासाठी मंजूर खारलॅंड बंधाऱ्याचे काम ठेकेदाराने वेळेवर पुर्ण केले असते तर उधाणाचे पाणी शेतात शिरले नसते.या साठी तातडीने काम सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबद्धल ग्रामस्थांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.
