पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे रस्त्यावर झाड पडून नुकसान…

⚡कुडाळ ता.२६-: पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे रस्त्यावर बुधवारी दुपारी ११ च्या सुमारास झाड पडून वाहतूक कोंडी झाली. या घटनेत सहा मोटरसायकल झाडाखाली सापडल्या. यात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही जीवितहानी झाली नाही. मात्र, झाडाची मोठी फांदी उसाच्या गाड्यावर पडून मोठे नुकसान झाले.
यावेळी सदर झाड हटविण्यासाठी सरपंच अजय आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर, तंटामुक्ती अध्यक्ष राघोबा धुरी, व्यापारी संघटना अध्यक्ष सुनील म्हापसेकर, व्यापारी उप अध्यक्ष दीपक गावडे, सतीश माडये, तुळशीदास पाटकर, उत्तम गावडे,राजु पिंगुळकर, पोलिस शाम भगत, हरेश पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मदत करुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

You cannot copy content of this page