राजन तेली:पदवीधर निवडणुकीसाठी कणकवलीत बजावला मतदानाचा हक्क..
⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडल्यामुळे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे एकतर्फी निवडून येणार असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान कणकवली तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर माजी आमदार तथा भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी श्री. तेली यांनी प्रत्येक बूथवर भेट देत आढावा घेतला.
