राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा…

अंनत भाटे: नट वाचनालयाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी…

बांदा/प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकराजे होते. त्यांनी मुलांच्या शिक्षणासह अनेक योजना शेतकरी व लोकांसाठी राबविल्या. यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. अशा लोकराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत अनंत भाटे यांनी येथे केले.
येथील नट वाचनालयच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री भाटे बोलत होते. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, संचालक जगन्नाथ सातोसकर, पत्रकार प्रवीण परब, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सुनील नातू, ओंकार धुरी, अमिता परब आदी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला एस आर सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आभार राकेश केसरकर यांनी मानले.

You cannot copy content of this page