शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाडे तात्काळ तोडा…

आशिष सुभेदार: मुख्याधिकारी साळुंखे यांच्याकडे केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.२६-: शहरात धोकादायक असलेले झाडे तात्काळ काढा आज खासकीलवाडा वटसावित्री परिसरात अचानक झाड तुटून रस्त्यावर आले व तेथील युवक बचावला वारंवार नगर परिषदेकडे जीर्ण झालेली झाडे काढण्यात यावी यासाठी मागणी करून देखील अशा घटना होत असतील तर ते दुर्दैव त्यामुळे खासकिवाडा भागासहित शहरातील रस्त्यालगत असलेले धोकादायक झाडे काढण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मा आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री साळुंखे यांच्याकडे केली आहे.

पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने सावंतवाडी शहरातील जीर्ण झालेली झाडे ही तात्काळ काढण्यात यावी जेणेकरून अनर्थ टळेल यापुढे असे झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा व वारंवार मागणी करून देखील नगरपरिषद लक्ष देत नसेल तर यानंतर असे प्रकार घडल्यास त्या सर्वस्वी नगरपरिषद जबाबदार असेल

You cannot copy content of this page