राजन तेलींनाच भाजपची उमेदवारी मिळावी…

हितेश धुरी; राजन तेली बाहेरचे नसून स्थानिकच आहेत..

⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी मतदारसंघातून भाजपच्याच कमळ चिन्हावर राजन तेली यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत अशी माहिती सावंतवाडी युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष हितेश धुरी यांनी आज येथे दिली. दरम्यान गेले दहा वर्ष राजन तेली या मतदारसंघात काम करतात त्यांची नाळ अनेक लोकांसोबत जुळलेली आहे त्यामुळे राजन तेली हे बाहेरचे नसून ते स्थानिकच आहेत जे कोणाला उमेदवारी हवी असेल तर त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे तशी मागणी करावी परंतु आपसात वाद करून त्याचा लाभ तिसऱ्याला होता कामा नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी असे ही धुरी यावेळी बोलताना म्हणाले ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली मागच्यावेळी अपक्षरण फक्त 12000 मतांनी पडले होते त्यामुळे यावेळी जर कमळ निशाणीही राजन तेली यांना मिळाली तर राजन तेली यांचा विजय निश्चित आहे त्यामुळे आम्ही सर्वजण युवा मोर्चाच्या माध्यमातून वरिष्ठ नेत्यांकडे तशी मागणी करणार आहोत. दरम्यान आमची सर्वांची एकच मागणी आहे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपसात वाद करू नये जी कोणाला उमेदवारी हवी असेल ते त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे संपर्क करावा परंतु आमची एकच मागणी आहे की राजन तेली या मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि एक दिलाने काम करून आम्ही राजन तेली यांना निवडून आणू असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी भूषण अंचेकर ,महादेव गावडे, समीर नाईक, प्रशांत भवलेकर,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page