सावंतवाडी ते माजगाव रस्त्याच्या कडेला केबलसाठी मारण्यात आलेले “चर” तत्काळ बुजवा…

अजय सावंत: मोठा अपघात घडून कोणाला दुखापत झाल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहिल…

⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी ते माजगाव येथे केबल घालण्यासाठी रस्त्याच्या कडेला मारण्यात आलेले चर तात्काळ बुजवण्यात यावे. एखादा अपघात घडून कोणाला दुखापत झाली तर त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहिल, असा इशारा भाजपचे पदाधिकारी अजय सावंत यांनी दिला आहे.

दरम्यान पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे केबल टाकण्यासाठी मारलेले चर हे धोकादायक आहे त्यामुळे एखादा अपघात घडून कोणालाही दुखापत झाल्यास जबाबदारी घेणार कोण ? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तात्काळ रस्त्याच्या कडेला मारलेले चर तात्काळ बुजवावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी एसटीचा देखील अपघात घडला होता त्यात ड्रायव्हरला किरकोळ दुखापात झाली होती.

You cannot copy content of this page