एकनाथ नाडकर्णी; आमदारकीचे तिकीट पाहिजे तर पक्षाकडे मागणी करावी..
⚡सावंतवाडी ता.०५-: संजू परबांनी आमदारकी पाहिजे असेल तर त्यांनी पक्षाकडे तशी मागणी करावी उगाच बोलून अंतर्गत वाद निर्माण करू नये असा पलटवार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केला.दरम्यान राजन तेलींवर टीका करण्यापेक्षा संजू परबांनी सावंतवाडी शहरात झालेले मतदान पाहावे आणि आत्मपरीक्षण करावे असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला.
