संजू परब यांचीही उपस्थिती; मतदारांचे मानले आभार
⚡सावंतवाडी ता.०५-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजय उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तळवडा येथे महायुतीच्या माध्यमातून विजय मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान यापुढे गावातील विकास कामांसाठी आवश्यक सहकार्य केले जाईल असे शब्दही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना देण्यात आला यावेळी संजू परब यांनी देखील या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर दादा परत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
