वैभववाडीत शनिवारी धनगर समाजातील दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांचा सत्कार…

दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्यावतीने आयोजन..

वैभववाडी प्रतिनिधी
दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजातील शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील दहावी व बारावी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक 8 जून 2024 रोजी मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे( मुंबई गोवा हावे नजीक) तालुका कुडाळ येथे सकाळी ठीक 10 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page