⚡कणकवली ता.०५-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे हे विजयी झाले. राणेंचे खारेपाटण येथे आगमन होताच भाजप व महायुतीतील घटक पक्षांतील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले.
नवनिर्वाचित खासदार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, रवींद्र जठार, दिलीप तळेकर, जयेंद्र रावराणे, मनोज रावराणे, रवींद्र शेट्ये, प्रकाश पारकर, रवी पाळेकर, दिगंबर मांजरेकर, बंड्या मांजरेकर, राजन चिके, तुळशीदास रावराणे, भाई नर, माजी पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, सूर्यकांत भालेकर, भाऊ राणे, मंगेश गुरव आदी उपस्थित होते.
राणेंचे खारेपाटण येथे आगमन होताच ‘नारायण राणे साहेब तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सिंधुदुर्ग भाजपतर्फे नारायण राणे यांना पुष्पहार त्यांचे अभिनंदन करण्यात आले. येवेळी ढोल ताशांचा गजर अन् फटक्यांची आतषबाजी करण्यात झाली.
