पाच दिवस लाईट नसणाऱ्या मडूरा गावात महायुतीला ८० टक्के मतदान…

संजू परब यांचा राजन तेलींना टोला:
शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित..

सावंतवाडी ता.०५-: पाच दिवस लाईट नसणाऱ्या मडूरा गावात महायुतीला ८० टक्के मताधिक्य मिळाले आहे. गेली २० वर्ष तिकडे एकहाती सरपंच आमचा बसत आहे अशीही टिका संजू परब यांनी तेलींनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला.

दरम्यान शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित आहे. दीपक केसरकर व भाजप एकत्र असताना मोठ मताधिक्य अपेक्षित होत. परंतु, अल्पसंख्याक व दलित समाज यांची साथ भाजपला मिळाली नाही. २० पैकी ४ बुथवरच विरोधकांना मताधिक्य मिळाले. त्याचा अधिक असल्यानं आमच मताधिक्य कमी पडलं असं मत श्री.परब यांनी व्यक्त केले.

तर ही मत भाजपला का पडली नाही ? याच चिंतन करून गैरसमज दूर केले जातील. भविष्यात हे मताधिक्य वाढलेलं दिसेल असा दावा संजू परब यांनी केला. यावेळी माजी सभापती संदीप नेमळेकर, गोविंद केरकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page