सावंतवाडीत शिंदे शिवसैनिकांचा जल्लोष

⚡सावंतवाडी ता.०४- : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या समर्थकांकडून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव शिवसैनिकांनी साजरा केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंना २० हजारांच मताधिक्य असेल असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणेंनी व्यक्त करत नारायण राणे पुन्हा केंद्रात मंत्री होतील असा दावा केला.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेली मेहनत पहाता सर्वाधिक मताधिक्य हे सावंतवाडी मतदारसंघातून नारायण राणेंना मिळेल. सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील शिवसैनिकांनी घेतलेली मेहनत पहाता हा विजय निश्चित होता. विजयात वाटा असलेल्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानत असल्याचे तालुकाप्रमुख बबन राणे म्हणाले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, महीला शहरप्रमुख भारती मोरे, गजानन नाटेकर, किरण नाटेकर, शर्वरी धारगळकर, विश्वास घाग, गुंडू जाधव, नंदू गांवकर, सुजित कोरगावकर, शैलैश मेस्त्री, सुभाष गावडे, दया परब, सदा कदम, संजय गावडे, नाना वारंग, विनायक महाडेश्वर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page